दस्तुरखुद्द क्रिकेटच्या देवाकडून स्वतःचे कौतुक ऐकण्यासाठी अनेक क्रिकेटर उत्सुक असतात आणि सचिन देखील खेळाला आणि खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देत असतो. यावेळेस सचिनचे मन ज्युनिअर कैफने जिंकले आहे. सचिनने इंस्टाग्रामवर मोहम्मद कैफच्या मुलाचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तो अतिशय सुरेख कव्हर ड्राईव्ह खेळताना दिसत आहे.
या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की, मोहम्मद कैफचा मुलगा बॉलिंग मशीनचा सामना करत आहे. ज्युनिअर कैफने व्हर्चुअल मशीनच्या साहाय्याने करत असलेल्या शानदार बॅटींगने सचिनचे मन जिंकले. मोहम्मद कैफ हा भारतीय संघाचा फलंदाज आणि क्षेत्ररक्षक होता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews